तू ये रे बा साईबाबा

                                                                                                         मागे
तू येर बा साईबाबा, तू येर बा साईबाबा ।
ओव्या गाऊ कौतुके तु येर बा साईबाबा ।। धृ ।।
विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा ।
अन शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा ।। १ ।।
आईबाबाला तहान लागली बाळ गेलं पाण्याला ।
अन दशरथाने बाण मारला श्रावण बाळाला ।। २ ।।
चंद्रभागेच्या पूर आला पाणी लागले वडाला ।
अन रुक्मिणी म्हणे धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला ।। ३ ।।
प्रभुरामाचा शिष्य तू अंजलीच्या सुता ।
हनुमंता उघड छाती दाखव रामसीता ।। ४ ।।
वृदावनीं कृष्णाने वाजवली बासरी ।
अन कृष्णाला पाहुनी बाया राधा झाली बावरी ।। ५ ।।
लावितो भस्म अंगाला शिवशंभो हा भोळा ।
अन नाग त्याने बैसविला गळा घालुनी वेटोळा ।। ६ ।।
शकुनीच्या कपताने पांडवसारा हरीवला ।
अन द्रवपती म्हणते धावतु कृष्णा पदर माझा ओडीला ।। ७ ।।
भक्ती त्याची पाहूनी गेला साई धावुनी ।
अन पाई आणल चालुनीया साई सेवक वाल्यानी ।। ८ ।।

3 comments: