राम आठवा थोड पुण्य साठवा

                                                                                                        मागे
राम आठवा थोड पुण्य साठवा,
पुण्याईचा चेक घ्या कुशाल वटवा,
कुणी राम आठवा …… ।। धृ ।।
आज्ञा पाळा तुम्ही साधुसंतांची,
लावा गोडी मनीराम नामाची,
जर तुम्ही ऐकले, तुमचे होईल भले, 
मार्ग बहुमोलाचा हा जगा पटवा ।। १ ।।
अमर नाही कुणी काळ टपलेला, 
कधी उचलील कुणा ठावे कुणाला, 
हो कुणी बोलू नका कोणी सांगू नका, 
शुद्ध भक्ती करा आणि राम आठवा ।। २ ।।
नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे, 
करा सार्थक जगी जर जन्माचे, 
झोप घेऊ नका वेळ जाईल फुका, 
राम नामाचा पाडा कुणी पठवा ।। ३ ।।

4 comments:

  1. हे गाणं जरी जुनं असलं , तरीही त्यातुन शिकण्यासारखे खुप आहे.🙏🙏

    ReplyDelete
  2. 🙏🏻👌 Jay shree Raam

    ReplyDelete
  3. 🌼🌼🌼🌼

    ReplyDelete
  4. khup chhan bhajan ....arthpurn...

    ReplyDelete