सत्यनारायण,सत्यनारायण । सत्यनारायणाचे करू भजन

                                                                                                                  मागे
सत्यनारायण,सत्यनारायण । 
सत्यनारायणाचे करू भजन ।। धृ  ।।
चार बाजूला केळी बांधून, समया लाविल्या दोन ।
कणा रांगोळी काढून चौरंग, सजविला फुलान ।। १ ।।
तांब्यात आंब्याची पाने, वर ठेवून ताम्हण ।
ताम्हणात तांदूळावर बसविला बाळकृष्णा ।। २ ।।
गजाननाचा विडा काढून, प्रथम त्यासी वंदन ।
नऊ ग्रहांची स्थापना केली, सुपाऱ्या नऊ ठेवून ।। ३ ।।
पतिपत्नी जोडीने करती, देवाचे पूजन ।
हळद कुंकू देवाला वाहून, बुक्का भाळी लावून ।। ४ ।।
एक हजार एकशे आठ, तुळशीपत्रे वाहून ।
तीर्थप्रसाद नैवेद्य देवाला दाखवून ।। ५ ।।
पोथी पुराण पाच कथा सांगताती ब्राम्हण ।
कथा - पुराण ऐकावया बसती भाविकजण ।। ६ ।।
भाविक जमती करती आरती लावूनी निरंजन ।
कमलसुत पुजेजवळ करी हरीभजन ।। ७ ।।

No comments:

Post a Comment