छान पालखी सजवा

                                                                                           मागे

छान, छान पालखी सजवा नी माझ्या साईला मिरवा ।
छान पालखी सजवा नी माझ्या बाबांना मिरवा ।। धृ ।।

हळद कुंकू घेऊन हाती, साईनाथाला विनवू किती,
माझ्या साईंना …,  जय साई ।
माझ्या बाबांना …, जय साई ।
माझ्या साईंना, माझ्या बाबांना,
नैवदय दाखवा नि माझ्या ।। १ ।।

लहान थोर धावत येती, साईबाबांचे दर्शन घेती,
माझ्या साईंना …,  जय साई ।
माझ्या बाबांना …, जय साई ।
माझ्या साईंना, माझ्या बाबांना,
चंदनाचा टिळा नि माझ्या ।। २ ।।

नारळ फुले धूप आरती, साईबाबांना पुजाया येती,
माझ्या साईंना …,  जय साई ।
माझ्या बाबांना …, जय साई ।
माझ्या साईंना, माझ्या बाबांना,
गावा गावात फिरवा नि माझ्या ।। ३ ।।

No comments:

Post a Comment