येळकोट, येळकोट, जय मल्हार

                                                                                                          मागे
येळकोट, येळकोट, जय मल्हार ।
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या ।
वाईच्या तू गणराया जागराला या या ।
पलसरणीच्या भैरवी देवा जागराला या या ।
शिर्डीच्या तू साईनाथा जागराला या या ।
शिंगणापूरच्या शनिदेवा जागराला या या ।
शेगावच्या गजानना जागराला या या ।
अक्कलकोटच्या स्वामी समर्था जागराला या या ।
गाणगापूरच्या दत्त देवा जागराला या या ।
पार्वतीच्या भोलेनाथ जागराला या या ।
गौरीच्या तू गणराया जागराला या या ।
गोकुळच्या तू कृष्णा कन्हैया जागराला या या ।
अयोध्याच्या रामराया जागराला या या ।
डोंगरावरच्या ज्योतीबा तू जागराला या या ।
पंढरीच्या विठुराया जागराला या या ।
भक्तांनो ओ भाविकांनो जागराला या या ।
जेजुरी गडा चौघडा वाजे चौघडा । कुण धरती ही अलीकडे ।
गड जेजुरी पलीकडे ।।
रूप दावुनी बानू गेली । स्वारी देवाची वेडी झाली ।
बानू बाईच येड लागल । मल्हारी देव मल्हारी ।
विसरून गेलय कोणा गावाला । मल्हारी देव भंडारी ।
येळकोट येळकोट बोलती ओ नित्यकाय भंडारा उडवती ।
नऊलाख पायरी गडाला ओ विडा जोडीला खडकाला ।
बोला हो तुम्ही बोला वाळसा दारीला ।
भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला ।
मल्हारी, मल्हारी, माझा कैवारी देव मल्हारी ।
मल्हारी मार्तंड जय मल्हार ।
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी ।
घेऊन चला कारभारी, अन मला बघायचेय जेजुरी ।
माझ्या मनाची हुरहूर भारी, माझ्या स्वप्नात येई मल्हारी ।
घेऊन चला कारभारी, अन मला बघायचेय जेजुरी ।

No comments:

Post a Comment