मागे
शिर्डीचा साई कोणी पाहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। धृ ।।
लिंबाखाली प्रगट झाला ।
साई रूपे तो भगवान आला ।
भगवा झेंडा साईने तिथे रोहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। १ ।।
चला चला शिर्डीला जाऊ ।
डोळे भरुनी त्या सईला पाहू ।
साई चरणी हा देह सारा वाहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। २ ।।
मन माझे आनंद नाचे ।
साई साई बोले माझे वाचे ।
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। ३ ।।
तुका म्हणे गाऊ साईंचे अभंग ।
गाऊ अभंग होऊनी दंग ।
साईभक्तांनी अभंग हा गाईला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। ४ ।।
शिर्डीचा साई कोणी पाहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। धृ ।।
लिंबाखाली प्रगट झाला ।
साई रूपे तो भगवान आला ।
भगवा झेंडा साईने तिथे रोहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। १ ।।
चला चला शिर्डीला जाऊ ।
डोळे भरुनी त्या सईला पाहू ।
साई चरणी हा देह सारा वाहिला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। २ ।।
मन माझे आनंद नाचे ।
साई साई बोले माझे वाचे ।
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। ३ ।।
तुका म्हणे गाऊ साईंचे अभंग ।
गाऊ अभंग होऊनी दंग ।
साईभक्तांनी अभंग हा गाईला ।
बसून कसा राहीला दगडावरी ।। ४ ।।
No comments:
Post a Comment