मागे
हे शिवशंकर गिर्जातनया गजनायक प्रभुवरा,
शुभकार्याच्या शुभप्रारंभी नमन तुला ईश्वरा ।। धृ ।।
प्रसन्न होऊन विघ्न हरावे,
नम्र कलेचे सार्थक व्हावे,
तुझ्या कृपेने यशकिर्तीच बहर येऊदे घरा ।। १ ।।
वंदन करोनी तुझला देवा,
रसीक जनांची करीतो सेवा,
कौतुक होऊन आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा ।। २ ।।
थोर भाग्य हे महाराष्ट्राचे,
पाईक आम्ही या भूमीचे,
महागणपती सिद्धीविनायक तुझा आम्हा आसरा ।। ३ ।।

No comments:
Post a Comment