मागे
दत्त दर्शनला जायचं, जायचं न जायचं ।आनंद पोटात माझ्या मावेना …।। धृ ।।गेलो गांडगापूरी थेट, घेतली दत्ताची भेट।या या नजरेत, आणि काही येईना ।। १ ।।रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर ।या या डोळ्याची, हौस पुरी होईना ।। २ ।।रूप नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग ।या या भजनाची, हौस पुरी होईना ।। ३ ।।नजर बंदीचा हा खेळ खेळे सदगुरू प्रेमळ ।खेळ खेळीता, खेळ पुरा होईना ।। ४ ।।
No comments:
Post a Comment