मागे
विठोबाच्या भजनात मृदुंग धाधींधा वाजतो ।
वारकरी आनंदे नाचतो ।। धृ ।।
युगे अठ्ठवीस विटेवरी उभा ।
वामंगी रखुमाई लावण्य शोभा ।
झुलझुल वाहे ही चंद्रभागा ।
भाव भक्तीच्या सागरात दर्शन भक्तांना घडवितो ।। १ ।।
गोड अभंग तुकारामाचे ।
जनाई सखुबाई मीराबाईचे ।
एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वराचे ।
देहभान विसरुनी अभंग विठोबाचे गातो ।। २ ।।
चंद्रभागेतिरी गोपाळ मेळा ।
तालासुरात गातो विठ्ठला ।
टाळ मृदुंगाचा नाद घुमला ।
अबीर गुलाल उधळीत गजर विठ्ठलाचा गातो ।। ३ ।।
विठोबाच्या भजनात मृदुंग धाधींधा वाजतो ।
वारकरी आनंदे नाचतो ।। धृ ।।
युगे अठ्ठवीस विटेवरी उभा ।
वामंगी रखुमाई लावण्य शोभा ।
झुलझुल वाहे ही चंद्रभागा ।
भाव भक्तीच्या सागरात दर्शन भक्तांना घडवितो ।। १ ।।
गोड अभंग तुकारामाचे ।
जनाई सखुबाई मीराबाईचे ।
एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वराचे ।
देहभान विसरुनी अभंग विठोबाचे गातो ।। २ ।।
चंद्रभागेतिरी गोपाळ मेळा ।
तालासुरात गातो विठ्ठला ।
टाळ मृदुंगाचा नाद घुमला ।
अबीर गुलाल उधळीत गजर विठ्ठलाचा गातो ।। ३ ।।
No comments:
Post a Comment