हे अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला

                                                                                    मागे

हे अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला ।
शिर्डीत प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला ।। धृ ।।

लिंबडाच्या झाडाखाली बायजा तो दिसला,
बाळ तो पारावरी बसला,
खंडेरायाच्या मंदिरी म्हाळसा साई त्या वंदला,
आ साई त्या वंदला न गाव त्याला बघाया निघाला ।। १ ।।

तिन्ही जगाचा पालन कर्ता कृष्णा तो अवतरला,
न साई माझा दगडावरी बसला,
डोईस फेटा हातात चिलीम अंगात यो डगला,
अंगात यो डगला न गाव त्याला बघाया निघाला ।। २ ।।

भिक्षा मागाया फकीर बाबा गावात तो हिंडला,
न येउन व्दारका माईत बसला,
स्वतः उपाशी राहून साई वाटी दुनयेला,
वाटी दुनयेला न गाव त्याला बघाया निघाला ।। ३ ।।

No comments:

Post a Comment