दिंडी चालली, दिंडी चालली, वाजे टाळ मृदूंग

                                                                                                         मागे
दिंडी चालली, दिंडी चालली, वाजे टाळ मृदूंग ।
विठोबाच्या झेंड्याचा भगवाच रंग ।। धृ ।।
पुंडलिकाने वीट जोडली तिचा तांबडा रंग ।
विठेवरी उभा हरी त्याचा सावळा रंग ।
कपाळा लाविला टिळा, त्याचा केशरी रंग ।। १ ।।
नेसलासे पितांबर त्याचा पिवळा रंग ।
अंगी शेला पांघरलेला त्याचा जांभळा रंग ।
तुळशी हार गळाभर, त्याचा हिरवा रंग ।। २ ।।
वारकऱ्यांचा पोशाख असे त्याचा पांढरा रंग ।
अभंग रचिला कमलसुत तो गहूवर्णी रंग ।
रंगी रंगला, रंगी रंगला, पांडुरंग श्रीरंग ।। ३ ।।

No comments:

Post a Comment